परभणी: पूर्णा तालुक्यातून अंतरवालीकडे हजारो मराठा बांधव रवाना | पुढारी

परभणी: पूर्णा तालुक्यातून अंतरवालीकडे हजारो मराठा बांधव रवाना

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव आज (दि. २४) पहाटे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. यात पुरुषासह महिलांचीही संख्या मोठी होती. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक भूमिका स्पष्ट करणार आहेत. यासाठी बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पूर्णा तालुक्यातील प्रत्येक गावातील १० ते २० जण अंतरवाली सराटीकडे वाहनाने रवाना झाले आहेत. यावेळी जरांगे- पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणा देण्यात आल्या. हजारो सकल मराठा समाज अंतरवालीकडे रवाना झाल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली.

दरम्यान, आज होळीचा सण असूनही सगेसोयरे अधिसूचना अंमलबजावणीच्या मागणीसाठी सकल मराठा समाज पेटून उठला आहे. या लढाईसाठी मोठ्या संख्येने महिला रणरागिणी देखील सरसावल्या आहेत. अंतरवालीतील बैठकीसाठी राज्यातून मराठा बांधव एकत्र येणार आहेत. या बैठकीत जरांगे कोणता निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

Back to top button