पैठण : नाथसागर धरणातील सौरऊर्जा प्रकल्‍पाला विरोध; मच्छिमारांचे जलसमाधी आंदोलन | पुढारी

पैठण : नाथसागर धरणातील सौरऊर्जा प्रकल्‍पाला विरोध; मच्छिमारांचे जलसमाधी आंदोलन

पैठण ; चंद्रकांत अंबिलवादे पैठण येथील नाथसागर धरणातील सौर ऊर्जेच्या नियोजित प्रकल्पाला विरोध करण्यासाठी हजारो मच्छिमार बांधव आज एकत्र आले. आपल्या कुटुंबांसह नाथसागर धरणाच्या परिसरात जलसमाधी आंदोलन करण्यासाठी मच्छीमार मोठ्या संख्येने एकत्र आल्‍याने धरण परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नाथसागर धरण क्षेत्रामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे पैठण, नेवासा, गंगापूर, शेवगाव, शहागड, गोंदी, राक्षसभवन या परिसरातील धरणाच्या पाण्यात मासेमारी करणाऱ्या कहार, भिल्ल कोळी समाज वर्षानुवर्ष या पाण्यातील मासेमारी करून आपली उपजीविका चालवीत आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने धरणाच्या परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने. हजारो मच्छिमार बांधवांनी मच्छिमार संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे.

आज (बुधवार) सकाळी साडेनऊ वाजता विविध भागातून मोठ्या प्रमाणावर मच्छिमार बांधव आपल्या कुटुंबातील लहान मुलांसह जलसमाधी आंदोलनात भाग घेण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे पोलीस निरक्षक संजय देशमुख यांनी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.

हेही वाचा : 

Back to top button