पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्जत-जामखेडमध्ये तसेच मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
संबंधित बातम्या –
पक्ष, चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवार गटाचा अहमदनगरमध्ये मेळावा आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत आज निर्णय होणार आहे. शरद पवार आज पक्षाच्या नव्या नावाचा पर्याय देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं पक्षाचं नवं नाव देणार, अशी चर्चा आहे.