Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटलांची तब्बेत खालावली, उभेही राहता येईना | पुढारी

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटलांची तब्बेत खालावली, उभेही राहता येईना

वडीगोद्री पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच खालावली आहे. त्यांना धड उभेही राहता येत नाही. जरांगे-पाटील स्टेजवरच कोसळले. त्यावेळी त्यांना तिथे असलेल्या दोघांनी सावरले आणि आधार दिला. अंतरावाली सराटीत जरांगे- पाटील यांचे सहाव्या दिवशी ही आमरण उपोषण सुरुच आहे. तसेच सलाईन व उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला आहे. प्रचंड अशक्त पणामुळे त्यांना उठून बसता ही येत नाही आणि उभाही राहता येत नाही. त्यातच ते स्टेजवर उभे राहत असतानाच कोसळले. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित अससेले गावकरी आक्रमक झाले आहेत. (Manoj Jarange Patil)

अंतरावाली सराटीमध्ये  एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरु झाली आहे. ग्रामस्थ मनोज जरांगे-पाटील यांना पाणी पिण्याच आवाहन करत होते. आज सकाळपासून ते झोपून आहेत. कालही त्यांनी माइक हातात घेतला तेव्हा त्यांचा हात थरथरत होता. पाणी घ्या, पाणी घ्या, जरांगे पाटील पाणी घ्या अशी घोषणाबाजी गावकरी, महीला व राज्यभरातून आलेल्या हजारो बांधवांनी सुरु केली. (Manoj Jarange Patil)

यावेळी एक मुलगी त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन आली होती, तर एक आजी बॅरीकेत वरून उडी मारुन रडत रडत व्यासपीठाकडे धावत गेल्या. त्यांनी पाटील तुम्ही पाणी घ्या अशी विनंती केली. पण मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घेतले नाही. वैद्यकीय उपचार न घेण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. समाजाच तुम्हाला ऐकावच लागेल. आज तुम्हाला पाणी प्यावच लागेल असा आवाज समोर असलेल्या गर्दीतून आला. त्यावर ठीक आहे, मी दोन घोट पाणी पितो, असे जरांगे पाटील म्हणाले. (Manoj Jarange Patil)

‘सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या’ (Manoj Jarange Patil)

पाणी पिण्याचा हट्ट केला, तर आरक्षण कसं मिळणार? असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुमची माया मला कळतेय. मी पाणी पिलो तर लेकराला न्याय कसा मिळेल. मी या समाजाला माय-बाप मानतो हे खरं आहे. सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या. पण तुम्ही जर असा हट्ट धरला, तर आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. जाणुन-बुजून मराठ्याच्या लेकरावर अन्याय केला जातो असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. शरीरात ताकत नसल्याने जरांगे पाटील आज झोपूनच उपस्थितांशी संवाद साधताना दिसत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button