Israel-Hamas War : ‘माझी मुलगी जिवंत नाही’ – हमासने बंधक बनवून नग्न धिंड काढलेल्या इस्रायली तरुणीचा मृत्यू | पुढारी

Israel-Hamas War : 'माझी मुलगी जिवंत नाही' - हमासने बंधक बनवून नग्न धिंड काढलेल्या इस्रायली तरुणीचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला होता, यात जवळपास २००च्या वर इस्रायली नागरिकांना बंधक बनवण्यात आले आहे. यातील शानी लौक या २२ वर्षिय तरुणीचा मृत्यू झाला आहे. हमासने शानीची नग्न धिंड काढली होती. हमासने हल्ला करताना इस्रायलमध्ये सुरू असलेल्या एका संगीत महोत्सवाला टार्गेट केले होते. या ठिकाणावरून डझनभर इस्रायली लोकांना बंधक बनवून नेण्यात आले होते. मार्गावरून धिंड काढत एका ट्रकमध्ये घालून त्यांना गाझात नेण्यात आले. (Israel-Hamas War)

या घटनेनंतर बंधक बनवण्यात आलेल्या नागरिकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडिओत एक तरुणी अर्धनग्नावस्थेत दिसत होती. या मुलीच्या शरीरावील टॅटू आणि केसांना केलेल्या कलरवरून ही मुलगी शानी लौक असल्याचे तिच्या आईने ओळखले होते.इस्रायलची बाचव कार्यकरणारी संस्था Israeli Zakaने शानी लौकच्या मृत्यूची बातमी लौक कुटुंबीयांना दिली आहे. (Israel-Hamas War)

“शानीचे संगीत महोत्सवातून अपहरण करण्यात आले, त्यानंतर तिचा छळ करून तिची गाझातून धिंड काढण्यात आली होती, तिच्यावर भयंकर अत्याचार करण्यात आले. शानीला आमची श्रद्धांजली,” असे ट्विट इस्रायल प्रशासनाने केले आहे. हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर मोठा हल्ला केला. यात १४०० लोकांचा बळी गेला, तर २३० लोकांना बंधक बनवण्यात आले आहे. तर इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत ८ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे. (Israel-Hamas War)

हेही वाचलंत का?

Back to top button