वाशीम : बोलेरो आणि ऑटोची धडक; १० जण गंभीर जखमी | पुढारी

वाशीम : बोलेरो आणि ऑटोची धडक; १० जण गंभीर जखमी

वाशीम, पुढारी वृत्तसेवा : बोलेरो आणि ऑटोच्या धडकेमध्ये दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मारुती शोरूमच्या समोर हा अपघात झाला. बोलोरो गाडी ही महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाची असून शासकीय कामानिमित्त पोहरादेवी येथे जात होती. अचानक ऑटो समोर आडवा आणल्याने हा अपघात झाला.

अपघाताची माहिती आरोग्य प्रमुख शुभम भोयर यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. कारंजा शहर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनाम केला.

हेही वाचा : 

Back to top button