बीड : मांजरसुंबा येथे ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; चार ठार | पुढारी

बीड : मांजरसुंबा येथे ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; चार ठार

बीड; पुढारी वृत्तसेवा : बीडमधील मांजरसुंबा नजीक अहमदपूर -अहमदनगर मार्गावर पिकअप व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक व पिकअपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप अशी पिकअपमधील मृतांची नावे आहेत. प्रल्हाद घरत आणि नितीन घरत या बाप – लेकांचा मृतांत समावेश असून मृत कंटेनर चालकाचे नाव अद्याप कळाले नाही. अपघातामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर मृतदेह शेवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button