Uddhav Thackeray: ठाकरे शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार: उद्धव ठाकरे यांचा पुनरूच्चार | पुढारी

Uddhav Thackeray: ठाकरे शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार: उद्धव ठाकरे यांचा पुनरूच्चार

कळंब, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारमध्ये मला काही अपरिहार्य कारणामुळे मुख्यमंत्री व्हावे लागले. परंतु, मी बाळासाहेबांना वचन दिले आहे की, शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करणार, त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, असा आशावाद धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील आयोजित जनसंवाद सभेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. Uddhav Thackeray

यावेळी खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी आमदार दयानंद गायकवाड, उपनेते शरद कोळी, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, माजी तालुकाप्रमुख रामलिंग आवाड, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, शंकरराव बोरकर, अतुल कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, युवासेनेचे तालुकाप्रमुख मनोहर धोंगडे, लक्ष्मण आडसुळ, संजय होळे, संतोष लांडगे, राजेश्वर पाटील, सचिन काळे आदी उपस्थित होते. Uddhav Thackeray

ठाकरे म्हणाले की, भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद घ्यायचे ठरले होते. परंतु गृहमंत्री अमित शहांनी शब्द फिरविला. शिवसेना ही माझीच असून त्यांनी राहुल नार्वेकरांना लोकसभेची लालुच दाखवून निकाल फिरविला. आता शिवसैनिक यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाहीत.

खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे- पाटील यांच्या कामाचे कौतुक करत तुम्हा दोघांनाही कायमस्वरूपी सभागृहात राहायचे आहे, असे सांगून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोघांची उमेदवारी फायनल असल्याचे यावेळी त्यांनी संकेत दिले.

आमदार कैलास घाडगे पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिलीप पाटील व लक्ष्मण आडसुळ यांनी सुत्रसंचालन केले. संजय होळे यांनी आभार मानले. यावेळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Uddhav Thackeray : पळपुटे डरपोक पळाले : संजय राऊत

ज्या ईडी सीबीआयला मी बांबू लावला, त्यांना घाबरून हे पळपुटे डरपोक पळाले. कळंबमध्ये निष्ठावंतांचा जनसागर उसळला असून येथील निष्ठावंतांचा ओके पॅटर्न (खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील) राज्यभर राबवू. गद्दारांना शिवसैनिकच काय, देव सुद्धा माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी फुटीर आमदारांना दिला.

मी सात वेळा आरक्षणावर सभागृहात बोललो – निंबाळकर

मी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, म्हणून मी सात वेळा सभागृहात आवाज उठविला, आम्ही पहिल्यापासूनच या लढ्यात आहोत. परंतु जरांगे पाटील फडणवीसांवर बोलल्यावरच काही जणांची तोंडे उघडली. त्यांना समाज महत्वाचा नाही आणि ते स्वत:चे धन लपविण्यासाठी भाजपमध्ये गेले असल्याचा आरोप भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर केला.

हेही वाचा 

Back to top button