धाराशिव : काँग्रेस नेते बसवराज पाटील यांचा अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश  | पुढारी

धाराशिव : काँग्रेस नेते बसवराज पाटील यांचा अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश 

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन ते मंगळवारी (दि.२७) सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई येथील भाजपाच्या कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश  पार पडला.
या वेळी बसवराज पाटील यांचे बंधू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे,विठ्ठल बदोले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हातात कमळ धरले. संपूर्ण राज्यात काँग्रेसची मोट बांधत इंडिया आघाडीवर जोरदार भाष्य करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँगेस ला सोडचिठ्ठी देत बसवराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
या वेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, रमेश कराड,हर्षवर्धन पाटील,भाजपचे जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य,माजी अध्यक्ष नितीन काळे, यांच्या सह जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील मुरुमचें सुपुत्र असलेले बसवराज पाटील यांनी त्यांच्या राजकिय प्रवासाची सुरवात जिल्हा  परिषदेच्या निवडणूकी पासून केली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची त्यांची संधी हुकली आणि उपाध्यक्ष म्हणून त्यानीं जिल्ह्यात काम केले.त्यांतत१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांना त्यावेळी मंत्रिपदाची संधी मिळाली होती. बसवराज पाटील हे १९९९ ते २००४ या काळात महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री होते.पण २००४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर उमरगा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे पक्षाने त्यांना २००९ च्या निवडणुकीत औसा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. तसेच त्याच्या पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असताना त्यांचा विजय झाला. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे भाजपाचे प्रतिस्पर्धी अभिमन्यू पवार यांनी श्री पाटील त्यांचा पराभव केला.यानंतर पक्षाने त्यांना प्रदेश कार्याध्यक्षपदाची संधी दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर बसवराज पाटील यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकल्याने मराठवाड्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. एका महिन्यातच काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे.

Back to top button