बीड: चिंचपूर इजदे येथे विठ्ठल महाराज अपघातात जखमी | पुढारी

बीड: चिंचपूर इजदे येथे विठ्ठल महाराज अपघातात जखमी

शंकर भालेकर

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या चारचाकी वाहनाचा टायर फुटल्यामुळे बुधवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास अपघात झाला. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे या गावाजवळ झाला. अपघातात महाराजांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रीक्षेत्र गहिनीनाथ  गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री आज दुपारच्या वेळी पाथर्डीकडे जात होते. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे या गावाजवळून जात असताना त्यांच्या चारचाकी वाहनाचा टायर फुटला. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व गाडी रस्ता सोडून खदानीमध्ये जाऊन आदळली. यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर गाडीमध्ये बसलेले विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या पायाला मार लागून दुखापत झाली. त्यांना प्राथमिक उपचारासाठी अहिल्यानगर येथील साईदीप या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पायाला आणि बरगडीला काहीसा मार लागला असल्याने ते पुण्यातील रुबी हॉस्पिटलमधील डॉ. ग्रॅन्ड यांच्याकडे पुढील उपचार घेणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button