जातीपातीचे राजकारण न करता पंकजा मुंडेंना प्रचंड मताधिक्याने निवडून देणार : भाऊसाहेब घुले | पुढारी

जातीपातीचे राजकारण न करता पंकजा मुंडेंना प्रचंड मताधिक्याने निवडून देणार : भाऊसाहेब घुले

आष्टी; पुढारी वृत्तसेवा : बीड लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच उमेदवार जोमाने प्रचार करत आहेत. भाजपा महायुतीकडून मा.मंत्री पंकजाताई मुंडे निवडणुक लढवत आहेत. त्यांनी युती सरकार काळात मंत्री पदावर असता कोणताही दुजाभाव न करता जिल्ह्यात विकास कामे मोठ्या प्रमाणावर केले आहेत. गेल्या दहा वर्षांत अनेक विकास कामे मार्गी लावले आहेत‌. केंद्रात भाजपाचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे.

विरोधी उमेदवाराला निवडणूक लढण्यासाठी मुद्दे नसल्याने जातीपातीचे राजकारण करु पाहत आहेत. परंतु, सुज्ञ मराठा बांधव अशा भुल थापांना बळी न पडता प्रचंड मताधिक्य देऊन दिल्लीत पाठवण्यासाठी पंकजा मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचंड मताधिक्याने निवडणून देणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घुले यांनी दिली.

पुढे बोलताना घुले म्हणाले, कोणत्याही निवडणुका आल्या की बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच जातीचा विषय काढण्यात येतो. परंतु, तो हवेत विरून जातो आणि निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर होतात. हे यापूर्वीही अनेकदा सिद्ध झाले आहे.

सुज्ञ मराठा समाज बांधव प्रवाहा बरोबर राहून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पंकजा मुंडे यांना खासदार पदावर विराजमान करण्यासाठी मतदार रुपी आशिर्वाद देणार आहे. विरोधी उमेदवार हे बुडणाऱ्या जहाजावर बसल्याने समाज त्यांना स्वीकारत नसल्याने जाति-पातीच राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यास सुज्ञ समाज बांधव भीक घालणार नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल.

Back to top button