बीड: गेवराई येथे १ लाख मराठा बांधवांसाठी मुस्लिम समाजाकडून जेवणाची सोय | पुढारी

बीड: गेवराई येथे १ लाख मराठा बांधवांसाठी मुस्लिम समाजाकडून जेवणाची सोय

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे – पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. १४) अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा होत आहे. या सभेला राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी चाकूर, अहमदपूर, गेवराई येथील मुस्लिम बांधवांनी नाष्टाची सोय केली आहे. गेवराई शहरातील बायपासवर १ लाख लोकांच्या नाष्टा आणि जेवणाची सोय केली केली आहे.

राज्यात मराठा आंदोलनाचा भडका होऊन समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य भरातून अंतरवाली सराटी येथे मराठा समाज एकवटणार आहे. दरम्यान, राज्यभरातून २५ लाखांच्या जवळपास मराठा बांधव सभेला येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अहमदपूर, चाकूर, गेवराई येथील मुस्लिम समाजातील बांधवांनी एकत्र येत गेवराई बायपासवरील भारत पेट्रोल पंपाशेजारी १ लाख मराठा बांधवांसाठी नाष्टा व जेवणाचे नियोजन केले आहे.

समस्त मराठा बांधवांनी या ठिकाणी नाष्टा, व जेवण करावे, असे अवाहन मुस्लिम समाजाकडून करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत पूर्ण ताकतीने मुस्लिम समाजसोबत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button