Aundha Nagar Panchayat election : निवडणूकीत ५४ उमेदवार रिंगणात | पुढारी

Aundha Nagar Panchayat election : निवडणूकीत ५४ उमेदवार रिंगणात

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा येथील नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२०-२१ ला ( Aundha Nagar Panchayat election ) सुरुवात झाली असून आज १३ डिसेंबर रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची तारीख होती. आज सोमवारी ५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. एकूण ५९ उमेदवारांपैकी ५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ५४ उमेदवार १३ प्रभागांमध्ये रिंगणामध्ये आहेत.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये उमेदवार कृष्णा धोंडीराज देव, प्रभाग १३ मध्ये उमेदवार वच्‍छलाबाई दादाराव देशमुख, प्रभाग ६ मध्ये उमेदवार शेख जरीना फातेमा अतिक तर प्रभाग ८ मध्ये उमेदवार सिता राम नागरे व प्रभाग ८ मध्ये उमेदवार इमरोज खाँ फिरोज खाँ पठाण या ५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता १३ प्रभागासाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन जयस्वाल यांनी दिली आहे.

औंढा नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक ( Aundha Nagar Panchayat election ) निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार डॉ. कृष्णा कानगुले, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, सचिन जोशी, ज्योती केजकर, शरद नाईकनवरे, संजय पाटील, शैलेश वाईकर, नितीन कुलकर्णी, अविनाश चव्हाण, महादेव बळवंते, विजय महामुने हे कार्यरत आहेत.

तर या निवडणुकीसाठी नगरपंचायतचे कर्मचारी निवडणूकीसाठी परिश्रम घेत आहेत. आता औंढा नागनाथ नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. पण निवडणुका रद्द होणार काय? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तरी उमेदवारांच्या मनामध्ये निवडणूक रद्द होणार की नाही याबाबत संभ्रम कायमच आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button