सातारा : कास पुष्प पठारावर अज्ञातांकडून आग | पुढारी

सातारा : कास पुष्प पठारावर अज्ञातांकडून आग

बामणोली (जि. सातारा); पुढारी वृत्तसेवा: जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर अज्ञातांकडून आग लावल्या जात आहेत. त्यामुळे पठारावरील वाळलेले गवत पेटत जाऊन पठार काळवंडले आहे. आज सोमवार (दि. १३) रोजी अशाच प्रकारे कास पुष्प पठारावर आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पठारावरील कास तलावाकडे उतरताना डाव्या बाजूच्या पठारावर अज्ञातांकडून आग ( कास पुष्प पठारावर अज्ञातांकडून आग ) लागल्याचे संतोष मारूती काळे यांना दिसले. आज दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी अज्ञातांनी आग लावली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कास पठार कार्यकारी समितीमध्ये कार्यरत असलेले वांजुळवाडी गावचे सदस्य संतोष मारूती काळे हे आपल्या गावी जात होते. त्यांना पठारावरील वाळलेले गवत पेटल असल्याचे दिसले. त्यांनी घरी न जाता ते परत फिरून पठारावरील ऑफिसजवळ आले. त्याठिकाणाहून त्यांनी कामावर असलेले कर्मचारी प्रदीप शिंदे कासाणी व सुजित जांभळे कास यांना बोलावून घेतले आणि आग विझवण्यास सुरूवात केली.

अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना आग विझवण्यात यश आले. मात्र, यावेळी पठारावरील कुंपण आग विझवण्यात अडसर ठरत होते. तसेच वाऱ्यामुळे आग पसरत होती. तरीही तिघांनी आपला जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर अथक प्रयत्नांनंतर आग विझली.

दरम्यान, आग विझवताना एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव गेल्यास किंवा त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याची व त्याच्या कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण जबाबदारी ही वनविभागाने उचलावी अशी आग्रही मागणी यानिमित्ताने केली जात आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button