परभणी : ‘वंचित’चे जिल्हा महासचिव मनोहर वावळे यांच्यावर प्राणघातक हल्ला | पुढारी

परभणी : 'वंचित'चे जिल्हा महासचिव मनोहर वावळे यांच्यावर प्राणघातक हल्ला

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा महासचिव मनोहर वावळे यांच्यावर बुधवारी (दि.२४) रोजी पहाटे १:४० वाजता राहत्या घरी प्राणघातक हल्ला झाला आहे. दरम्यान या घटनेने जिल्हाभरातील वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून सुत्रधारासह आरोपींना अटक करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

संबंधित बातम्या 

वंचितचे जिल्हा महासचिव म्हणून कार्यरत असलेले मनोहर वावळे यांच्यावर शहरातील जायकवाडी वसाहत येथे राहत्या घरी पहाटे १:३० वाजता झोपेतून उठवून बाहेर बोलवत प्राणघातक हल्ला केला. ४ ते ५ हल्लेखोरांनी त्यांना लाठीकाठीने व बेल्टने मारहाण केली. या मारहाणीत वावळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले.

दरम्यान मारहाणीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेने जिल्हाभरातील वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मनोहर वावळे मारहाण प्रकरणाची तत्काळ चौकशी करून मारहाणीचा सुत्रधार व आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Back to top button