बीड : केजजवळ दुचाकी अपघातात महिलेचा जागीच मृत्यू | पुढारी

बीड : केजजवळ दुचाकी अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

केज; पुढारी वृत्तसेवा : एका नातेवाईकांच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. केज शहरातील केजडी नदीच्या पुलावर सोमवारी (दि.३१) सकाळी ८ च्या सुमारास हा अपघात झाला. किशोरी प्रभाकर गंगणे (वय ५४ वर्ष, घाटनांदूर ता. अंबाजोगाई) असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशोरी गंगणे या केज येथील त्यांच्या मावस बहिणीचे सासरे वारल्याने त्यांच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमासाठी सकाळी मुलासोबत दुचाकीवरून केजकडे निघाल्या होत्या. केज शहरातील केजडी नदीच्या पुलावर आल्या असता दुचाकी घसरल्याने त्यांचा अपघात झाला. अपघातात डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जमादार रुक्मिण पाचपिंडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यांनतर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button