Earthquake : हिंगोली जिल्ह्यासह नांदेड भूकंपाने हादरले

भूकंप
भूकंप

[visual_portfolio id="5152"]
हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि यवतमाळला भूकंपाचा धक्का बसला. हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर व कुरुंदा परिसरात हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरापर्यंत जाणवले. तसेच नांदेड येथेही हा धक्का जाणवला.

४.४ रिश्टर स्केलवर भुकंप

नांदेड येथे झालेल्या भूकंपाची नोंद रिश्टर स्केलवर ४.४ एवढी नोंदली गेली आहे. वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्‍यांच्या सीमेवर तीन वर्षांपासून भूगर्भातून आवाज येत आहेत. मात्र, रविवारी सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी बसलेला धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता.

कळमनुरी तालुक्याला धक्का

कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, पोत्रा, वारंगा फाटा, दांडेगाव, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव या परिसरात हे धक्के जाणवले.

सांडस परिसरातही दोनदा आवाज झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भूगर्भातून मेघगर्जनेसारखा आवाजही आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वसमत शहरासह पांगरा शिंदे, कवठा, कुरुंदा, बोराळा, खुदनापूर, किनोळा, बोरगाव भागात भूकंपाचे धक्का जाणवले. याबाबत तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लातूर येथील भूकंप मापक केंद्राशी संपर्क साधला असल्याचे सांगितले.

भूकंप
भूकंप

या भूकंपामुळे अजून नुकसानाची नोंद नाही. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. औंढा तालुक्यातील येळेगाव सोळुंके आणि इतर गावांत भूकंपाचे धक्के जाणवले.

यावेळी पहिल्यांदाच हिंगोली शहरात धक्का जाणवल्याने अनेजण याबाबत फोनवर विचारना करताना दिसत होते. तसेच नांदेडच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये  : जिल्हाधिकारी

आज सकाळी 8:33 मि. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी होती.
मी आपल्या शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, मुख्यालय यांच्याशी संपर्कात असून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आम्ही घेत आहोत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले

हे ही वाचा

पहा व्हिडिओ : हिरण्यकेशीकाठी अश्मयुगीन संस्कृतीच्या पाऊलखुणा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news