देगलूर : बुद्धिबळ स्पर्धेत ओमकार पेटेकर महाराष्ट्रातून पहिला, देगलूरच्या शिरपेचात मानाचा तुरा | पुढारी

देगलूर : बुद्धिबळ स्पर्धेत ओमकार पेटेकर महाराष्ट्रातून पहिला, देगलूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

देगलूर : पुढारी वृत्तसेवा- मुंबई येथील सर जे. जे. हॉस्पिटलचा विद्यार्थी, बुद्धिबळपटू ओमकार बालाजीराव पेटेकर याने अखिल भारतीय वैद्यकीय बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या विद्यमाने खेळविण्यात आलेल्या बुध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्रातून पहिला तर देशातून नववा क्रमांक मिळवला. त्याच्या या यशामुळे देगलूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या स्पर्धेत भारतातील संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये देशातील 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये वन्नाळी येथे कला शिक्षक असलेले बालाजी पेटेकर यांचा मुलगा ओमकार पेटेकर हा २०० स्पर्धकातून देशात नवव्या क्रमांकाने यशस्वी झाला. त्याने महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला असून तो आता महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्याच्या दैदिप्यमान यशाबद्दल त्याच्या मुंबई येथील सर जे.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक व सर्व मित्र परिवारांनी त्याचे कौतुक केले. यापूर्वीही त्याने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, जिंकत विभागीय स्पर्धेत सुद्धा बाजी मारली होती. त्याच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, हितचिंतकांनी त्याचे कौतुक केले.

हेही वाचा

Back to top button