विराट, धोनी नाही तर रिंकू ‘या’ माजी क्रिकेटपटूला मानतो आपला आदर्श | पुढारी

विराट, धोनी नाही तर रिंकू 'या' माजी क्रिकेटपटूला मानतो आपला आदर्श

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल ) स्‍पर्धेत दिग्‍गज खेळाडूंपेक्षा नवाेदित खेळाडूंची कामगिरी चकमदार हाेत आहे. यामध्‍ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा फलंदाज रिंकू सिंग यांचे नाव आघाडीवर आहे. सोमवारी (दि.९) झालेल्‍या सामन्‍यात अखेरच्‍या षटकात रिंकू सिंगने चौकार फटकावत पुन्‍हा एकदा केकेआरच्‍या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. शेवटच्‍या षटकातील फटकेबाजीमुळे रिंकू पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी त्‍याने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार फटकावत गुजरात टायटन्सविरुद्ध ‘केकेआर’ला विजय मिळवून दिला होता. रिंकू सिंग कोणत्‍या क्रिकेटपटूला आदर्श मानतो, असा प्रश्‍न तुम्‍हाला पडला असेल. जाणून घेवूया त्‍याच्‍या यशात मोठा वाटा असणार्‍या क्रिकेटपटूविषयी…(Rinku and Raina)

Rinku and Raina : कोण आहे रिंकू सिंगचा आदर्श खेळाडू ?

क्रिकेटमधील आपला आदर्श खेळाडूविषयी बोलताना रिंकूने सांगितले होते की, “सुरेश रैना हा माझा आदर्श खेळाडू आहे. सुरेश रैना सुरुवातीपासूनच माझा आदर्श आहे . मी त्याला फॉलो करतो. तो एक उत्‍कृष्‍ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहे.”

 सुरेश रैनाने केली होती रिंकूला मदत

रिंकूच्‍या घरची परिस्‍थिती हालाख्‍याची होती. त्‍याचे वडील घरगुती सिलिंडर पोहोचवण्याचं काम करतात. त्‍याने परिस्‍थितीवर मात करत आपल्‍या प्रतिभेवर क्रिकेटमध्‍ये यश मिळवले आहे. संघर्षाच्‍या काळात त्‍याला सुरैश रैना याने मदत केली होती. त्‍या काळात रिंकू हा एलपीजी गॅस गोडावूनमध्‍ये राहत असे. यावेळी सुरेश रैनाने त्‍याची भेट घेतली होती. यावेळी त्‍याने रिंकूला क्रिकेट किट भेट दिले होते. तसेच उत्तर प्रदेश क्रिकेट संघात खेळ्‍यासाठीही मदत केली होती. २०११ च्‍याविश्‍वचषक स्‍पर्धेत टीम इंडियातील खेळाडू असणारा सुरेश रैना याला ‘मिस्टर आयपीएल’ म्‍हणूनही ओळखले जात असे.

रिंकू सिंगला २०१८ मध्‍ये सर्वप्रथम शाहरुख खानच्‍या ‘केकेआर’ संघाकडून खेळण्‍याची संधी मिळाली होती. तो सलग सहा वर्ष केकेआर कडून खेळत आहे. यंदाच्‍या हंगामात त्‍याला केकेआरने ५५ लाख रुपयांना खरेदी केले होते. एकेकाळी हालाखाच्‍या आर्थिक परिस्‍थितीशी दोन हात करणार्‍या रिंकूचे आताचे वार्षिक उत्‍पन्‍न सुमारे ५८ ते ६४ लाख रुपये इतके आहे. त्‍याची एकूण संपत्ती ६ कोटी रुपये इतकी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

हेही वाचा 

Back to top button