छत्रपती संभाजीनगर : पिता पुत्रावर मधमाशांचा हल्‍ला; पित्‍याचा जागीच मृत्‍यू | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : पिता पुत्रावर मधमाशांचा हल्‍ला; पित्‍याचा जागीच मृत्‍यू

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्‍तसेवा छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्‍यात एक धक्‍कादायक घटना समोर आली आहे. मजुरीच्या कामावरून पायी घरी चाललेल्‍या पिता-पुत्रावर मधमाश्यांनी हल्‍ला केला. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्‍यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. सोयगाव तालुक्‍यातील शिंदोल शिवारात आज (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मधमाशांनी केलेल्‍या हल्‍ल्‍यात वडिलांचा मृत्‍यू झाला. यामध्ये मुलगा देखील गंभीर जखमी झाला असून त्‍याला उपचारांसाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. सय्यद सबदर सय्यद इस्माईल (वय 58 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, आबिद सय्यद सबदर असे त्यांच्या जखमी मुलाचे नाव आहे.

हेही वाचा : 

Back to top button