पंतप्रधानांकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका | पुढारी

पंतप्रधानांकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उद्योगपती गौतम आदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काय संबंध आहेत, याचा पंतप्रधानांकडून खुलासा होत नाही, तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करीत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने भाजपाविरोधात लढा उभारायला सुरुवात केली आहे, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, 2019 मध्ये कर्नाटकमध्ये एका सभेत राहुल गांधी यांनी वक्तव्य केले. त्यांच्या विरोधात भाजपाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकाकर्त्यांनेच ती स्थगित ठेवण्याची विनंती न्यायालयास केली होती.

Back to top button