संजय राऊत धमकी प्रकरणी उपमुख्‍यमंत्री फडणवीसांचा खुलासा, "आरोपीने दारुच्‍या नशेत..." | पुढारी

संजय राऊत धमकी प्रकरणी उपमुख्‍यमंत्री फडणवीसांचा खुलासा, "आरोपीने दारुच्‍या नशेत..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणी कोणाला धमकी दिली तर या ठिकाणी सरकार आणि पोलिस शांत बसणार नाहीत. संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याची ओळख पटली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याने दारुच्या नशेत धमकीचा मेसेज केला आहे, असे उमुख्‍यमंत्री व राज्‍याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१ ) स्‍पष्‍ट केले. (Devendra Fadnavis)

अभिनेता सलमान खान आणि तुम्ही आमच्या टार्गेटवर आहात. दिल्लीतील पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्याप्रमाणे तुम्हालाही मारु, असा धमकी असणारा मेसेज संजय राऊत यांना मिळाला होता. या प्रकरणी संजय राऊत यांनी फिर्यादही दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून दोघांना अटक केली आहे. संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याला अटक करण्‍यात आली आहे. त्याने दारुच्या नशेत धमकी दिल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे, असे फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले.

मी गृहमंत्री झाल्याने बऱ्याच जणांची अडचण

संजय राऊत यांनी गृहमंत्री विरोधकांना आलेल्या धमकीची चेष्टा करतात या विधानावर बोलत असताना  फडणवीस म्हणाले, “मी गृहमंत्री झाल्याने बऱ्याच जणांची अडचण झाली आहे; पण मी गृहमंत्री राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला गृहमंत्री म्हणून चार्ज दिला आहे.  जो कोणी बेकायदेशीर काम करत असेल त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. मी यापूर्वीही पाच वर्षे गृहमंत्री म्‍हणून काम केलेले आहे.”

हेही वाचा 

Back to top button