औरंगाबाद : अजिंठात अवैध धंद्याविरूद्ध ‘सपोनि भिंगारे’ यांची धडाडीची कारवाई | पुढारी

औरंगाबाद : अजिंठात अवैध धंद्याविरूद्ध 'सपोनि भिंगारे' यांची धडाडीची कारवाई

अजिंठा पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद जळगाव महामार्गावरून गुटख्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो अजिंठा पोलिसांनी मंगळवारी (ता. १४ ) रात्रीच्या सुमारास सापळा रचून पकडला. आयशरमध्ये असलेला सुमारे २० लाखाच्या गुटख्यासह १५ लाखाचा आयशर टेम्पो असा एकूण सुमारे ३५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांनी नुकताच अजिंठा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी अवैध्य धंद्या विरुद्ध मोठी कार्यवाही केल्याने अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

माहितीनुसार, औरंगाबाद जळगाव महामार्गावरून चार चाकी वाहनातून गुटख्याची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, सिल्लोड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे, उपनिरीक्षक राजू राठोड, पोहेकॉ अक्रम पठाण, संजय कोळी, विकास चौधरी, अरुण गाडेकर, निलेश शिरस्कर, प्रभाकर जाधव आदिंनी अजिंठा गावा निकट असलेल्या हॉटेल आशीर्वाद जवळ रात्रीच्या सुमारास सापळा रचला.

महामार्गावरून सुमारे १० च्या सुमारास आयशर टेम्पोची (क्रमांक एम एच २१ बीच ४७३५) अडवून पाहणी केली. त्यात विमल, आर एम डी, पान पराग,आदी सुमारे १९ लाख ८६ हजार ८०० रुपयाचा गुटखा आढळून आला. गुटखासह १५ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेऊन चालक गजानन अंबादास लोखंडे (रा.तपोवन ता.भोकरदन, जि. जालना) अण्णा गजानन जगताप (रा.राजूर ता.भोकरदन), अमोल प्रभाकर तुपे (रा.उंबरखेडा ता.भोकरदन) या तिघांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक राजू राठोड करीत आहे.

हेही वाचा

Back to top button