Hingoli : औंढा नागनाथ पोलीस हैराण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

Hingoli : औंढा नागनाथ पोलीस हैराण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

हिंगोली पुढारी वृत्तसेवा :  एका अज्ञात मोबाईल धारकाने 112 वर त्रास देण्याच्या उद्देशाने औंढा नागनाथ पोलिसांना हैराण करून सोडण्याचा प्रकार नुकताच घडला. या प्रकरणातील अज्ञात इसमावर कलम भा.द.वी 182 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. औंढा नागनाथ पोलिसमध्ये महिला पोलिस नीता ठोके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल हरकाळ करीत आहेत. (Hingoli)

Hingoli : खून झाला आहे…

माहितीनुसार आज (11 फेब्रुवारी) औंढा नागनाथ पोलिस स्टेशनमध्ये 112 नंबर वर अज्ञात इसमाने कॉल केला. हे कॉल 98 28 15 98 47 या मोबाईल क्रमांकावरून केले गेले आहेत. सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी, १० वाजून ४० मिनिटांनी, त्यानंतर पुन्हा एकदा कॉल केला.  प्रत्येक वेळी विविध ठिकाणचा उल्लेख करत खून झाला आहे  सांगण्यात आले आहे. कॉल आल्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागून त्या ठिकाणी पोहोचली. परंतू कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले. तिसऱ्यांदा कॉल आल्यानंतर पोलीस यंत्रणेस नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याबद्दल अदखलपात्र गुन्हा दाखल केला केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा 

Back to top button