जालना : वृद्ध दाम्पत्याला लिफ्ट घेणे पडले महागात; सोने-रोख रक्कमेची लुटमार | पुढारी

जालना : वृद्ध दाम्पत्याला लिफ्ट घेणे पडले महागात; सोने-रोख रक्कमेची लुटमार

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : वडीगोद्री येथे एका वृद्ध दाम्पत्याला लिफ्ट देऊन त्यांची लुटमार केल्याची घटना घडली. सोमवारी (दि. १९) दुपारी ३ च्या दरम्यान सोने व रोख 3 हजार रुपयांची लुटमार केल्याची घटना घडली. गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या या वृद्ध दाम्पत्याला लिफ्ट घेणे महागात पडले आहे.

अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथील बाबासाहेब गंगाराम हर्षे (वय 65) व मंदाबाई बाबासाहेब हर्षे (वय 60) हे  वृद्ध दाम्पत्य डोळे दाखवण्यासाठी गेवराई येथे गेले होते. गेवराई येथून आपल्या गावी पाथरवाला खुर्द येथे जात असताना वडीगोद्री -जालना रोडवरील वडीगोद्री बसस्थानकवर गाडीची वाट बघत होते. याचवेळी एका पांढऱ्या रंगाच्या कारने दाम्पत्यांना लिफ्ट दिली. या कारमध्ये महिला आणि दोन पुरुष व दोन लहान मुले बसलेली असताना चालकाने विचारले की कुठे जायचे आहे, बाबा तुम्हाला चला सोडतो या बहाण्याने गाडीत बसूवून घेतले. पुढे पाथरवाला खुर्द गावाकडे न नेता शहागड दिशेने गाडी निघाली.

याचदरम्यान वृद्ध दाम्पत्याने विचारले कि इकडे कुठे जात आहे, तर डिझेल टाकाण्यासाठी जात आहे, असे म्हणून रस्त्याच्या बाजूला उसाच्या शेताजवळ उतरून दिले. खाली उतरल्यानंतर दाम्पत्यांच्या आपली लुटमार झाली असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती गोंदी पोलिसांना दिली असून अद्याप मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही.

हेही वाचा

Back to top button