परभणी : क्रुझर-दुचाकीच्या अपघातात एकजण जागीच ठार | पुढारी

परभणी : क्रुझर-दुचाकीच्या अपघातात एकजण जागीच ठार

पाथरी, पुढारी वृत्तसेवा : पाथरी-माजलगाव राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कट पॉईंटवर दुचाकी आणि क्रुझरच्या झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात बुधवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास झाला. मोहम्मद (वय ३५) असे अपतात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की , पाथरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवरून बुधवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख खालेद व शेख मोहम्मद शेख जलील हे इंदिरा नगर येथे घराकडे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कट पॉईंटमधून वळत असताना माजलगावकडून पाथरीकडे येणाऱ्या जीपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोहम्मद नामक युवकाचा मृत्यू झाला. तर खालेद शेख गंभीर जखमी झाले.

गंभीर जखमी असलेल्या खालेद शेख यांना तात्काळ परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, खालेद शेख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले आहे. घटनेनंतर बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास या भागातील संतप्त नागरीकांनी राष्ट्रीय महामार्गवर रास्तारोको केला.वारंवार होत असलेल्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सदर रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

हेही वाचलंत का?

Back to top button