IND VS BAN 1st Test : बांगलादेशी फिरकीपटूसमोर विराटची उडाली भांबेरी! काही कळायच्या आत… (VIDEO) | पुढारी

IND VS BAN 1st Test : बांगलादेशी फिरकीपटूसमोर विराटची उडाली भांबेरी! काही कळायच्या आत... (VIDEO)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली पहिल्या डावात केवळ 1 धाव करून बाद झाला. फिरकीपटू तैजुल इस्लामने त्याला माघारी धाडण्याची किमया साधली. तैजुलच्या गुगलीने विराट देखील चक्रावला आणि तो पायचीत झाला. पंचांनी जराही विलंब न करता विराटला बाद घोषित केले. टीम इंडियाच्या रन मशिनची विकेट घेतल्यानंतर तैजुल इस्लामच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने उड्या मारून सेलीब्रेशन केले. (IND VS BAN 1st Test)

पंचांनी विराट बाद असल्याचा निर्णय दिल्यानंतर त्याने डिआरएस घेतला होता. गेल्या काही सामन्यांमध्ये विराटला फिरकी गोलंदाजांविरोधात चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, तैजुल इस्लामने विराटला असा चेंडू टाकला की, विराटला या चेंडूला कसे थोपवायचे काहीच समजले नाही आणि तो क्षणार्धात बाद झाला. (IND VS BAN 1st Test)

तत्पूर्वी, बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये भारताला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. के.एल.राहुल, शुभमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. राहुल 22 तर शुभमन गिल 20 धावा करून तंबूत परतले. तर विराट केवळ 1 धाव करून बाद झाला. (IND VS BAN 1st Test)

 

हेही वाचलंत का?

Back to top button