बीड : बडतर्फ प्राध्यापकाची केली कार्यकारी प्राचार्यपदी नियमबाह्य नियुक्ती? | पुढारी

बीड : बडतर्फ प्राध्यापकाची केली कार्यकारी प्राचार्यपदी नियमबाह्य नियुक्ती?

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा :  अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात सन १९९३ पासून कायमस्वरूपी सेवारत असलेल्या प्राचार्यांना डावलून संस्थेच्या कथित पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. विद्यापीठाची दिशाभूल करून एका बडतर्फ प्राध्यापकाची महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्यपदी नियमबाह्य नियुक्ती केली, अशी माहिती संस्थासचिव, संस्था संचालक यांनी अंबाजोगाईत आयोजित पञकार परिषदेतून दिली आहे. या पदाधिकाऱ्यांच्या तसेच विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१२) महाविद्यालय बंद ठेवून आंदोलन ही करण्यात आले. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कथित पदाधिकाऱ्यांचे सतत सुरू असलेले कारनामे ऐकून व पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

संस्थासचिव माधवराव पाटील टाकळीकर व संस्था संचालक प्रदीप दिंडीगावे यांनी पञकार परिषदेत दिलेली माहिती अशी की, शिक्षण संस्थेत अंतर्गत वाद मिटविण्यासाठी तत्कालीन संस्थासचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी यशस्वी प्रयत्न केले होते. वाद मिटवून त्यांनी संस्थेत एक प्रकारची शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यात त्यांना यश ही मिळत होते. असे असतानाच पुन्हा एकदा ही संस्था आपली व्यक्तिगत मालमत्ता आहे, असे समजून चालणाऱ्या काही जुन्या कथित पदाधिकाऱ्यांनी नको त्या मार्गांचा अवलंब करून चुकीच्या पध्दतीने संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणी अजून ही न्यायालयीन लढा चालूच आहे, असे असताना देखील या कथित पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या जवळपास सर्वच युनिटमध्ये सतत हस्तक्षेप करून त्या ठिकाणची शिस्त बिघडविण्याचा जणू काही सपाटाच लावला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button