मनी लाँड्रिंग प्रकरण : प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले, एस. शशिधरण यांना अंतरिम जामीन मंजूर | पुढारी

मनी लाँड्रिंग प्रकरण : प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले, एस. शशिधरण यांना अंतरिम जामीन मंजूर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: मनी लाँड्रिंग प्रकरणात ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले आणि एस. शशिधरण यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला दिला. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी गेली दोन वर्षे कोठडीत असलेल्या या दोघांनाही प्रत्येकी एक लाखांचा सशर्त अंतरीम जामीन मंजूर केला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोले यांना टॉप्स सिक्युरिटी या ग्रुपविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ईडीकडून अटक केली होती. दोन वर्षे कोठडीत असलेल्या अमित चांदोलें, एस. शशिधरण यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या समोर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. दोघांनाही तपास यंत्रणेकडे पासपोर्ट जमा करण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :  

Back to top button