हिंगोली: टेंभूदरा वीज उपकेंद्र बंद करण्याचा पिंपळदरी ग्रामस्थांचा इशारा | पुढारी

हिंगोली: टेंभूदरा वीज उपकेंद्र बंद करण्याचा पिंपळदरी ग्रामस्थांचा इशारा

औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपळदरी येथे एक महिन्यापासून गावठाण हद्दीतील ट्रांसफार्मर जळाल्यामुळे बदलून देण्यात आलेला नाही. त्यामुळे टेंभुरदरा ३३ केवी वीज उपकेंद्र गुरुवारी (दि.१३) बंद करण्याचा इशारा ग्रामपंचायत कार्यालय पिंपळदरी आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील टेंभुदरा वीज उपकेंद्रातून नेहमीच कमी अधिक दाबाने वीज पुरवठा होत असतो. यामुळे ट्रांसफार्मरसह विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार नेहमीच घडतात. पिंपळद येथील गावठाण हद्दीतील ट्रांसफार्मर गेल्या महिन्यापासून जळाल्यामुळे आणि वीज वितरण कंपनीने नवीन ट्रांसफार्मर बदलून न दिल्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील वीज उपकेंद्रामधून एकीकडे पिंपळदरी जलाल दाभा, तर दुसरीकडे जामगव्हाण कंजारा आदीसह १५ ते १७ गावांना वीज पुरवठा केला जातो.

गेल्या महिन्यापासून पिंपरी गावठाण मधील ट्रांसफार्मर बंद असल्यामुळे ग्रामपंचायतकडून वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु वीज बिल थकबाकीचे कारण पुढे करून अधिकारी मात्र चाल ढकल करत आहेत. त्यामुळे सरपंच रत्नमाला संजय भुरके, उपसरपंच धम्मदीप भगत आणि ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.१३) ३३ केव्ही उपकेंद्र बंद करण्याचा  इशारा दिला आहे. वीज वितरण कंपनीकडून वेळीच दखल घेण्याची गरज आहे. मात्र, याकडे महावितरणकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून हाेत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button