MS Dhoni : ‘विस्डेन’च्या ऑलटाईम फेवरेट इंडियन टी-२० संघातून धोनीला डच्चू | पुढारी

MS Dhoni : 'विस्डेन'च्या ऑलटाईम फेवरेट इंडियन टी-२० संघातून धोनीला डच्चू

पुढारी ऑनलाईन डेस्क :  क्रिकेट विश्वातील ख्‍यातनाम मासिक ओळख असणार्‍या ‘विस्डेन’ने भारताचा ऑलटाईम फेवरेट टी-२० संघ बनवला आहे. ऑस्ट्रेलियात विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या संघातील ७ खेळाडूंचा विस्डेनच्या यादीत समावेश आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे भारताला पहिला आणि एकमेव टी-२० विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार एम.एस. धोनीला (MS Dhoni) संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर, दिनेश कार्तिकला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री विस्डेन ऑलटाईम फेवरेट इंडियन टी-२० संघाची घोषणा केली. कोणत्याही मानकांनुसार संघ निवडणे सोपे नसते. क्रिकेटमध्ये सर्वत्र स्पर्धा आहे. टी-२० फॉरमॅटच्या सुरुवातीच्या काळातील खेळाडूंची आजच्या खेळाडूंशी तुलना करणे सोपे नाही. असे संघाची घोषणा करताना विस्डेन मासिकाने म्हटले आहे. (MS Dhoni)

या ७ खेळाडूंचा विस्डेनच्या संघात समावेश

विस्डेनच्या ऑल टाइम टी-२० फेवरेट संघामध्ये समाविष्ट केलेल्या १२ खेळाडूंपैकी ७ खेळाडू ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियात सहभागी आहेत, तर ४ खेळाडूंची २००७ च्या विजयी संघातून निवड करण्यात आली आहे. सध्याच्या विश्वचषक संघाबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, भुवनेश्वर कुमार यांची नावे आहेत, तर २००७ चा विश्वविजेता युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी संघात स्थान मिळवले आहे

संघात धोनीला स्थान का नाही?

विस्डेन मासिकाने धोनीला संघात स्थान न दिल्याबद्दल विश्लेषण केले आहे. ‘टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या कर्णधार धोनीला बाहेर ठेवणे सोपे नव्हते.’ धोनीला संघात स्थान न देण्यापाठीमागे विस्डन ही चार कारणे दिली आहेत.

ही आहेत कारणे…

  • कार्तिकने संघात पुनरागमन केले आहे आणि ते विकेटकीपिंग आणि फिनिशरची धोनीची जागा हिरावण्यासाठी पुरेसे आहे.
  • दिनेश कार्तिकला टी- २० फॉरमॅटचा चांगला अनुभव आहे. कार्तिकने टीम इंडियासाठी पहिला टी-२० विश्वचषकही खेळला होता आणि तो २०२२च्या विश्वचषक संघाचा भाग आहे.
  • आयपीएलच्या गेल्या मोसमातील काही सामन्यांमध्ये कार्तिकने यष्टिरक्षक आणि फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली.
  • धोनी क्रिकेटपासून दूर आहे. आणि तितके सामने खेळत नाही. याचा परिणाम आकड्यांवर झाला आहे, तर कार्तिकचे आकडे चांगले आहेत.

विस्डेनचा ऑलटाईम फेवरेट इंडियन टी-२० संघ

रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, हार्दिक पंड्या, सुरेश रैना, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, वीरेंद्र सेहवाग.

हेही वाचा;

Back to top button