बीड : अग्रीम पिकविम्यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको | पुढारी

बीड : अग्रीम पिकविम्यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

युसूफ वडगांव; पुढारी वृत्तसेवा :  सोयाबीन पिकावर पडलेल्या येलो मोजाँक व तांबोरा रोगामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी व 25% अग्रीम पिकविमा पण देण्यात यावा, या मागणीसाठी केज तालुक्यातील युसूफवडगांव येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला.

 यंदा सोयाबीन ऐन बहरात आल्यावर पावसाने दिलेल्या विश्रांतीमुळे सोयाबीन पीक सुकून गेले आहे. त्यातच राहिलेल्या सोयाबीन पीकावर येलो मोजॉंक व तांबोरा रोग पडल्याने उरले – सुरले पीकही शेतकऱ्यांच्या हातून निसटून गेले आहे. तसेच पिकविमा कंपनीने 25% अग्रीम पिकविम्यातुन युसूफवडगांवला वगळल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.  ही पिकविमा कंपनी तक्रारीचे दाखलेही घेत नाही. त्यामुळे अशा कंपनीवर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व येलो मोजाँक,तांबोरा रोगामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देऊन 25% अग्रीम पिकविमाही देण्यात यावा. यासाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत  निदर्शने केली.

     हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button