केज-बीड रोडवरील कोरेगावजवळ अपघात : तरुण ठार, दोघे गंभीर | पुढारी

केज-बीड रोडवरील कोरेगावजवळ अपघात : तरुण ठार, दोघे गंभीर

केज(बीड),पुढारी वृत्‍तसेवा : केज-बीड रोडवर मोटारसायकल आणि स्‍कूल बसचा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तरुण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

केज-बीड रोडवरील कोरेगाव जवळ शनिवारी (दि. २४) दुपारी रस्त्यात उभ्या असलेल्या गाडी क्र. (एम एच-४४ /९९९६) ला मोटार सायकलीने क्र. ( एम एच -१३/बी जे ८५७४) ने जोराची धडक दिली. यात मोटार सायकलवरील सुनील मधुकर शिंदे ( वय २५  रा. पिंपळगाव ता. केज) हा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला.  भागवत कल्याण पवार वय (२२ वर्ष) आणि दीपक कल्याण पवार ( वय २०, दोघे रा. कोरेगाव ता. केज ) यांच्या डोक्याला व छातीला मार लागला असल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्‍यान, ग्रामस्‍थांनी रूग्णवाहिकेशी तात्‍काळ संपर्क साधून जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्‍यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल करण्‍यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button