कोराना : राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत विचार | पुढारी

कोराना : राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत विचार

जालना; पुढारी वृत्तसेवा : केंद्राने सध्याच्या सणासुदीच्या काळात रस्त्यावर गर्दी वाढून पुन्हा कोरानाची साथ पसरण्याची भीती व्यक्‍त केली आहे. त्यामुळे रात्रीची संचारबंदी लागू करण्याची शिफारसही त्यांनी केली आहे.

या प्रस्तावाचा राज्य सरकार विचार करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

येत्या काळात कृष्णाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव असे विविध सण आहेत. सणामध्ये कोरोना रुग्णांमधे वाढ होण्याची भीती आहे.

केरळमधे वाढलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्राने राज्यांना सूचना जारी केल्या आहेत. केंद्राने दिलेले निर्देश राज्यातही पाळले जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्राकडून ज्या प्रमाणात राज्याला लसींचा साठा पुरवला जातोय त्या प्रमाणात राज्य लसीकरण करीत आहे. पुढच्या महिन्यापासून राज्याला 50 लाख लस वाढवून मिळणार आहेत.

ज्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या अत्यंत कमी आहे, तिथे शाळा सुरू करण्यासाठी विचार केला जात असून तेथील शिक्षकांना लसीकरण करण्यासाठी येणार्‍या 5 तारखेपर्यंत शिबीर घेण्याचा विचार केला जात असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

Back to top button