हिंगोली : संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान, बंजारा समाजात जल्लोष | पुढारी

हिंगोली : संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान, बंजारा समाजात जल्लोष

वसमत; पुढारी वृत्तसेवा : ९ तारखेला झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये बंजारा समाजाला न्याय मिळाला असून बंजारा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल समाजाच्यावतीने जिंतूर फाटा येथील जगदंबा ट्रान्सपोर्ट येथे मिठाई व फटाक्याची अतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मागासलेल्या बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे संजय राठोड यांचा मंत्रिमंडळ विस्तारात शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युतीच्या सरकारमध्ये बंजारा समाजाला न्याय दिल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बंजारा समाजाच्या महिला कार्यकर्त्यां मुनिता जाधव याच्या उपस्थितीत वसमत जिंतूर फाटा चौकात  बंजारा समाजाच्यावतीने फटाके फोडून व मिठाई ( पेढे ) वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठल पवार ,प्रकाश पवार, आनंद राठोड, शिवाजी राठोड, विलास जाधव, निलेश जाधव, समाजाचे बाधंव मित्रमंडळी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button