महावितरणच्या ग्रामीण तंत्रज्ञ धमकीप्रकरणी एकावर गुन्हा | पुढारी

महावितरणच्या ग्रामीण तंत्रज्ञ धमकीप्रकरणी एकावर गुन्हा

मानवत(परभणी); पुढारी वृत्तसेवा: विजबिल थकबाकी वसुली व वीज चोरी उघडकीस आणण्याच्या उद्देशाने गावात आलेल्या महावितरणच्या पथकातील ग्रामीण तंत्रज्ञ याला एकाने पुन्हा गावात आला तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

यानंतर ग्रामीण तंत्रज्ञ याने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तालुक्यातील केकरजवळा येथील धमकी देणाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज बिलवसुली व वीज चोरी मोहिमेस सुरूवात

याबाबत माहिती अशी की, महावितरण कंपनीच्या वतीने सध्या तालुक्यात वीज बिलवसुली व वीज चोरी मोहिमेस सुरूवात केली आहे. मंगळवारी (दि. २४) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास केकरजवळा येथे कार्यरत असलेले महावितरणचे तंत्रज्ञ प्रदिप मगरे हे सहाय्यक अभियंता सुधाकर गिरी, प्रधान तंत्रज्ञ श्रीपती एडके, ज्ञानेश्वर ठमे, अमोल घोगरे, संतोष जिंदे, एस. डी. टाकनकर, पांडुरंग कापसे, राजेश कसाब या पथकासह तालुक्यातील केकरजवळा येथे गेले होते.

यावेळी गावातील श्रीधर बालासाहेब लाडाने याने महावितरणचे पथक गावात का घेऊन आलात? असे म्हणत पथकातील प्रदिप मगरे यांचे अंगावर धावून गेले. तसेच श्रीधरने पुन्हा गावात दिसल्यास जिवे मारण्याची धमकीदेखील तंत्रज्ञ प्रदिप मगरे यांनी दिली.

सदरील घटना गावातील मारोती मंदिराजवळील डीपीजवळ सार्वजनिक रस्त्यावर घडली आहे.

याप्रकरणी श्रीधर लाडाने याच्यांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पाेलिस उपनिरीक्षक भारत जाधव करीत आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button