नाशिक पोलीस : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बजावली नोटीस | पुढारी

नाशिक पोलीस : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बजावली नोटीस

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल नाशिक मधील सायबर पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांना नाशिक पोलीस यांनी २ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे.

ना. राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नाशिकचे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे ना. राणे यांना पकडण्यासाठी शहर पोलिसांचे एक पथक रत्नागिरी येथे गेले होते. दरम्यान, राणे यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने राणे यांना जामीन दिला.

नाशिकला गुन्हा दाखल असल्याने या गुन्ह्याच्या तपासासाठी २ सप्टेंबरला हजर राहण्याची नोटीस शहर पोलिसांनी बजावली आहे. नोटीस बजावून २५ जणांचे पथक नाशिकला माघारी आले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधातील कारवाई कायदेशीर आहे. त्यांना न्यायालयाने भविष्यात वादग्रस्त वक्तव्याची पुनरावृत्ती होणार नाही असे सांगत जामीन दिला आहे. त्यानुसार या गुन्ह्याच्या तपासासाठी ना. राणे याना नाशिकला हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची आवश्यकता नाही.

दीपक पांडेय, पोलिस आयुक्त, नाशिक पोलीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर येथे अटक करुन महाड न्यालयात हजर केले. प्रथम वर्ग ऩ्यायदंडाधिकारी शेखभाऊसो पाटील यांच्या समोर या प्रकरणी सूनावणी झाली. उभय पक्षाची बाजू ऐकून घेवून न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button