कोरोना संसर्ग भारतात आणखी काही काळ राहणार : डब्ल्यूएचओ | पुढारी

कोरोना संसर्ग भारतात आणखी काही काळ राहणार : डब्ल्यूएचओ

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : कोरोना संसर्गाने संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. आपल्‍या जगण्‍यामध्‍येच आमुलाग्र परिणाम केलेल्‍या कोरोना विषाणू केव्‍हा हद्‍दपार होणार, हा प्रश्‍न प्रत्‍येकाचा मनात आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्‍य संघटनेने ( डब्ल्यूएचओ ) आपले मत मांडले आहे. डब्ल्यूएचओ ने व्‍यक्‍त केलेले मत हे देशवासीयांची चिंता वाढविणारे ठरले आहे.

डब्ल्यूएचओच्‍या मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. सौम्‍या स्‍वामीनाथन यांनी म्‍हटले आहे की, भारतामध्‍ये कोरोना महामारी ही आता एंडेमिक स्‍टेजमध्‍ये आली आहे.

एंडेमिक स्‍टेज म्‍हणजे, नागरिक संसर्गासह जगणं शिकू लागतात. मात्र संसर्गाचा स्‍तर हा कमी किंवा मध्‍यम अवस्‍थेत राहतो.

याचा अर्थ देशात कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटेसारखी भयावह परिस्‍थिती असणार नाही. मात्र संसर्ग पूर्णपणे कमी होणार नाही.

भारतातील या परिस्‍थितीबाबत स्‍वामीनाथन म्‍हणाल्‍या, भारतातील वेगवेगळ्या राज्‍यांतील लोकसंख्‍येची घनता आणि अन्‍य परिस्‍थितीमुळे एंडेमिक स्‍टेजमधील कोरोना रुग्‍णसंख्‍येचे स्‍वरुप कायम राहणार आहे.

२०२२पर्यंत देशात ७० टक्‍के लसीकरण पूर्ण होईल

देशात २०२२पर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण ७० टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण होईल. यानंतर देशातील परिस्‍थिती सामान्‍य होईल. लहान मुलांना होणार्‍या कोरोना संसर्गाबाबत स्‍वामीनाथन म्‍हणाल्‍या, आम्‍ही केलेल्‍या सर्वेक्षण आणि अन्‍य देशांमधील अध्‍ययनानुसार स्‍प्‍ट होत आहे की, लहान मुलांना संसर्गाची भीती आहेच;पण याची तीव्रता कमी असेल, असा दिलासाही त्‍यांनी दिला.

डब्ल्यूएचओने कोवाक्‍सिनला मंजुरी दिली आहे. आता कोवाक्‍सिन लसीचा समावेश डब्ल्यूएचओच्‍या अधिकृत लसींमध्‍ये झाला आहे. याचे सकारात्‍मक परिणाम सप्‍टेंबरपर्यंत दिसतील, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडिओ : कोरोना निदान, उपचार आणि रेडिऑलॉजी : डॉ. प्रवीण घाडगे

Back to top button