

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मागील २४ तासांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली. एका दिवसात ३७ हजार ५९३ नवे रुग्ण आढळले. तर एका दिवसात ६४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत १२ हजारांहून अधिक रुग्ण वाढल्याने सरकारच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे.
मागील २४ तासांमध्ये ३७ हजार ५९३ नवे कोरोना रुग्ण आढळले. ३४ हजार १६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
देशात सध्या ३ लाख २२ हजार ३२७ सक्रीय रुग्ण आहेत.
देशात कोरोना मुळे आतापर्यंत ४ लाख ३५ हजार ७५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर ३ कोटी १७ हजार ५४ हजार २८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील २४ तासांमध्ये ६३.४५ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
मंगळवारी देशात २५ हजार ४६७ नवे रुग्ण आढळले होते. ३५४ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
तर ३९ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले होते. त्याचबरोबर एकुण लसीकरणाचा आकडा हा ५८ कोटींच्या पुढे गेला होता.
केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
मागील २४ तासांमध्ये राज्यात २४ हजार २९६ नवे रुग्ण आढळले. तर १७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये आतापर्यंत १९ हजार ७५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पॉजिटिव्हिटी रेट हा मागील ३० दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
सध्या देशात सक्रीय रुग्णांची टक्केवारी ०.९९ इतकी आहे. तर पॉजिटिव्हिटी रेट हा २.१० टक्के आहे.
हेही वाचलं का ?