बीड : नीट परीक्षेला जाताना वाहन उलटून चौघे जखमी | पुढारी

बीड : नीट परीक्षेला जाताना वाहन उलटून चौघे जखमी

केज : पुढारी वृत्तसेवा : परभणी जिल्ह्यातील पाथर्डी येथील विद्यार्थी त्यांच्या पालकासोबत अहमदनगर येथे नीटची परीक्षेसाठी जात होते. त्यावेळी अंबाजोगाई-केज रस्त्यावर होळनजीक त्यांचे वाहन अपघात होऊन पलटी झाले. त्यात दोन विद्यार्थी व दोन पालक असे चौघे जखमी झाले आहे. हा अपघात आज (दि.१५) झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी जि. परभणी येथील सुरेश सिरसाट (वय ५०), विनोद सिरसाट (वय ४२ ), सौरभ सिरसाट (वय १९) आणि सुजित सिरसाट (वय १८) व अन्य एकजण असे पाचजण अहमदनगर येथे नीट परीक्षेसाठी बोलेरो गाडीतून जात होते. त्यांची गाडी केजच्या दिशेने होळपासून पुढे आली असता होळ ते चंदनसावरगाव दरम्यान त्यांची बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातमध्ये सौरभ सिरसाट आणि सुजित सिरसाट हे दोन विद्यार्थी व सुरेश सिरसाट आणि विनोद सिरसाट हे दोन पालक जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे चालक मकरंद घुले यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे आपत्कालीन विभागात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे हे पुढील कारवाई करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button