औरंगाबाद : विहिरीत आढळला मृतदेह; शिवना परिसरात खळबळ | पुढारी

औरंगाबाद : विहिरीत आढळला मृतदेह; शिवना परिसरात खळबळ

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे विहीरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. सुनील भगवान अपर (वय ४५, रा. मादणी ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आज (दि.१९) सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शिवणा परिसरात अनिल गुप्ता यांच्या शेतामध्ये मजुर सोयाबीन पेरणीसाठी गेले होते. यावेळी त्यांना विहीरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. या घटनेची माहीती मिळताच सरंपच रघुनाथ वाघ व पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अजिंठा पोलीसांना माहीती देण्यात आली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढून पंचनामा केला. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुत करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button