धुळे महापालिका: सभेत कचरा आणून नगरसेवकांनी केला निषेध | पुढारी

धुळे महापालिका: सभेत कचरा आणून नगरसेवकांनी केला निषेध

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे महापालिका महासभेत कचऱ्याच्या नियोजनावरून गदारोळ झाला. कचर निर्गतीला महानगरपालिकेला अपयश येत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महासभेत कचरा आणून रोष व्यक्त केला.

कचऱ्याच्या या प्रश्नावरुन सत्ताधारी भाजपा व विरोधकांमधे खडाजंगी झाली.

पुण्यात अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह फेकला नदीत

सारा अली खानच्या सेक्सी अदांची चाहत्यांना पडलीय भूरळ

धुळयाचे आमदार फारुख शाह यांनी पत्र देवून विरोध दर्शवल्यानेच नवीन ठेकेदारास कार्यादेश देता येत नसल्याचा आरोप यावेळी धुळे महापालिका भाजपा नगरसेवकांनी केला आहे.

धुळे महापालिका महासभा आज प्रभारी महापौर भगवान गवळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यासभेत सुरुवातीसच विरोधी गटाचे नगरसेवक कमलेश देवरे , आमेर अन्सारी , आमिन पटेल, साबीर खान आदींनी महासभेत कचरा  आणला.

हा कचरा महापौरांच्या आसनाच्या समोर असलेल्या खुल्या जागेत टाकून या नगरसेवकांनी घोषणाबाजी करण्यात आली.

शहर कचरामुक्त करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आले.

या घोषणाबाजीस भाजपाचे नगरसेवक शीतलकुमार नवले, हिरामण गवळी , प्रतिभाताई चौधरी आदींनी विरोध दर्शवला.

त्यांनी शहराचे आमदार फारुख शाह यांनी प्रशासनास पत्र देवून नवीन ठेकेदारास कार्यादेश देण्यास विरोध दर्शवला आहे, असे सांगितले

त्यामुळे हे पत्र महासभेत वाचून दाखवुन खरा प्रकार उघड करण्याचे आव्हान नवले यांनी दिले.

धुळे मनपाने सहा महिन्यापुर्वी नवीन ठेकेदारास काम देण्याचे निश्चित झाले असतांना त्यांना कार्यादेश देण्यात दिरंगाई करण्यात येत आहे.

यापुर्वी माजी आमदार अनिल गोटे यांनी अनेक पत्र देवून कामांसंदर्भात आपली भूमिका व्यक्त केली असतांना मनपातील सत्ताधारी गटाने या पत्रांची दखल घेतली नाही.

मग आता विद्यमान आमदाराच्या पत्राच्या मागे लपण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप देखिल सभेत करण्यात आला.

Back to top button