पुण्यात अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह फेकला नदीत | पुढारी

पुण्यात अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह फेकला नदीत

आळंदी ; पुढारी वृत्तसेवा : चिंबळी (ता.खेड जि.पुणे) येथील इंद्रायणी नदीपात्रात अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह नदीत टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. पोत्यात भरलेला व हातपाय बांधलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला असल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी गुरुवारी (दि.१२) सकाळच्या सुमारास चिंबळी येथील स्मशान भूमी जवळच्या इंद्रायणी नदी पात्रात पोत्यात भरलेला, हातपाय बांधलेले, शरीर पाण्याने फुगलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

मृतदेहाचे वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्षे असून महिलेचा खून केल्या प्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

Back to top button