कोण होणार करोडपती?: मनोज वाजपेयी-सयाजी शिंदे येणार कर्मवीर विशेषमध्ये | पुढारी

कोण होणार करोडपती?: मनोज वाजपेयी-सयाजी शिंदे येणार कर्मवीर विशेषमध्ये

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कोण होणार करोडपती? या कार्यक्रमाच्या कर्मवीर विशेष भागात मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे सहभागी होणार आहेत. कोण होणार करोडपती? मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे हे येणार आहेत.

कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात.

जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. सातारा येथील सह्याद्री देवराई सामाजिक  संस्थेला ते मदत करणार आहेत.

सयाजी शिंदे आणि मनोज वाजपेयी हे जिंकलेली रक्कम मदत म्हणून देणार आहेत.

सयाजी शिंदे हे नाटक आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे.

फक्त आपल्या अभिनयासाठी नाही तर समाजसेवेसाठीसुद्धा त्यांना ओळखलं जातं.

त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाजपयोगी कामं केली आहेत.

मनोज यांनी आपल्या दर्जेदार अभियानयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे.

अनेक उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत, अजूनही देत आहेत.

मनोज वाजपेयी हे हरिवंश राय बच्चन यांचे चाहते

मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे हे सचिन खेडेकर यांच्याससोबत.

मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे हे मित्र आहेत. त्यांनी शूल या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

या चित्रपट दरम्यानच्या आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला.

मनोज वाजपेयी हे हरिवंश राय बच्चन यांचे चाहते आहेत.

वाजपेयी यांनी हरिवंश राय बच्चन यांची कविता मंचावर म्हणून दाखवली.

वाजपेयी यांनी सचिन खेडेकर मालिका करत असताना त्‍यांच्‍या अभिनयातले बारकावे पहिले.

त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांनी कसे वापरले, हेही सांगितलं आहे.

पाहा- कर्मवीर विशेष, १४ ऑगस्ट, रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

हेही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ – पुण्याच्या निकीताने केला भरतनाट्यममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड | Nikita set world record in bharatnatyam 

Back to top button