सलमानच्या घरावरील हल्ला प्रकरणात आणखी दोघांना पंजाबमध्ये अटक | पुढारी

सलमानच्या घरावरील हल्ला प्रकरणात आणखी दोघांना पंजाबमध्ये अटक

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पंजाबमधून दोघाजणांना अटक केली आहे. या हल्ला प्रकरणात दोघाजणांना मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली.

या प्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांना मुंबई पोलिसांनी वाँटेड घोषित केले आहे. अनमोलच्या सांगण्यावरून दोन हल्लेखोरांना पिस्तूल व काडतुसे पुरवणार्‍या सुभाष चंदर आणि अनुज थापन या दोघांना मुंबई पोलिसांनी पंजाबमध्ये अटक केली.

Back to top button