उस्मानाबाद : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन | पुढारी

उस्मानाबाद : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात (petrol-diesel Prices) उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (शुक्रवार) शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती (petrol-diesel Prices) भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोल डिझेल दरवाढ दररोज होत आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली. तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही एक हजार रुपये जवळ पोहचला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारने दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी दिला.

दरम्यान, पुणे हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर रिकाम्या गॅस सिलिंडर टाकीला व मोटारसायकल रस्त्यावर आडवी करून हार घालून निषेध करण्यात आला. यावेळी टाळ, मृदंग, हालगी, ढोल ताशाच्या आवाजाने परिसर दुमदूमन गेला होता. यावेळी आंदोलनकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button