Indian Railway Food : रेल्वे विभागाची मोठी घोषणा; २ एप्रिलपासून उपवासाचे पदार्थ मिळणार | पुढारी

Indian Railway Food : रेल्वे विभागाची मोठी घोषणा; २ एप्रिलपासून उपवासाचे पदार्थ मिळणार

पुढारी ऑनलाईन डेस्क 

देशात दर महिन्याला कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी अधिकाधिक सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच केला जातो. यामध्येच रेल्वेने (IRCTC) प्रवाशांसाठी आणखी एक नवीन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीनिमित्त प्रवाशांना लसूण, कांद्याशिवाय असलेले शुद्ध आणि सात्विक उपवासाचे खाद्यपदार्थ देण्यात येणार आहेत. या पदार्थांमध्ये सामान्य मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर केला जाईल. अशाप्रकारे ट्रेनमध्ये प्रवास करताना, प्रवाशांना खास तयार केलेल्या पारंपारिक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

भारतीय संस्कृतीत देवावरील श्रद्धेमुळे अनेक लोक उपवास करतात. परंतु लांबच्या प्रवासावेळी उपवास असेल, तर मात्र गैरसोय होते. येत्या काही दिवसातच चैत्र नवरात्र सुरू होत आहे. या चैत्र नवरात्रामध्ये नऊ दिवस भाविक देवीची पूजा करतात, उपवास ठेवतात आणि देवदर्शनासाठी लांबचा प्रवासही करतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

हे खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी प्रवाशांना ई-केटरिंग किंवा 1323 क्रमांकावर कॉल करून जेवणासाठी आधी नोंदणी करावी लागेल. या जेवणामध्ये (Navaratri special thali) लस्सी, फळांचा ताजा रस, भाजी पुरी, भजी, फळं, चहा, दुग्धजन्य पदार्थ (रबडी, लस्सी), सुक्या मेव्याची खीर आदी पदार्थ असणार आहेत.

हेही वाचलत का ?

 

Back to top button