Insurance policy : थर्ड पार्टी की कॉम्प्रिहेन्सिव?; वाहनासाठी विमा पॅालिसी कोणती चांगली

Vehicle Insurance Policy
Vehicle Insurance Policy
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात विना-इन्शुरन्स गाडी चालविणे गुन्हा आहे. यासाठी योग्य विमा पॅालिसी  (Insurance policy) कोणती हे जाणून घेऊया. भारतात खूप साऱ्या विमा कंपन्या आहेत. ज्या वेगवेगळ्या सुविधांसह अनेक योजना ग्राहकांना देतात. कित्येकदा वाहनधारक चुकीची पॅालिसी केल्यानंतर पश्चाताप झाल्याची भावना व्यक्त करतात. तुम्हाला अशा परिस्थितीला सामोरे जायचे नसेल तर ही माहिती नक्की तुमच्या फायद्याची असेल.

आईडीवी पॉलिसी (IDV)

आईडीवी विमा (IDV Insurance) घेतेवेळी एक कमाल विमा रक्कम निश्चित केली जाते. जी दुचाकी वाहनाचे नुकसान आणि चोरी झाल्यानंतर परतावा देते. तुमचे वाहन जसजसे जुने होत जाते, तसतसे पॅालिसीचा परतावा कमी कमी होऊ लागतो. यामुळे दरवर्षी द्यावा लागणारा प्रीमियम देखील कमी होतो.

कॉम्प्रिहेन्सिव पॉलिसी

Third party Policy आणि Own Damage Policy असे एकत्रीत असणाऱ्या पॅालिसीच्या पॅकेजला कॉम्प्रिहेन्सिव पॅालिसी म्हणतात. वाहन धारकाचे तसेच इतर व्यक्ती व वाहनाचे नुकसान होते त्यावेळी ही पॅालिसी नुकसान भरपाई देते. IRDA (Insurance Regulatory and Development Authority) कडून हे दिर्घकालीन पॅकेज पॅालिसी घेण्याची अट काढून टाकण्यात आली आहे.

थर्ड पार्टी विमा

थर्ड पार्टी विम्यामध्ये तुमच्याद्वारे झालेल्या दुर्घटनेमध्ये कोणताही क्लेम तुम्हाला मिळत नाही, पण याउलट समोरच्याला हा लाभ मिळतो. म्हणजेच समजा की, तुमची दुचाकी ही चारचाकी अथवा दुसऱ्या दुचाकीला धडकते अशा दुर्घटनेवेळी विमा कंपनी तुमच्या समोरच्याला या नुकसान भरपाई देते. थर्ड पार्टी विमा जर तुमची दुचाकी ही चोरी झाली तर याचा क्लेम तुम्हाला मिळत नाही. कारण चोरी गाडीचे कवच सुविधेचा यामध्ये समावेश नाही. याचाच अर्थ असा की थर्ड पार्टी विमा अंतर्गत तुमच्या वाहन दुर्घटनेतील समोरच्या व्यक्तीला याचा लाभ मिळतो.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news