औरंगाबाद : एसटी वाहकाचा मृत्यू; कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ - पुढारी

औरंगाबाद : एसटी वाहकाचा मृत्यू; कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : नाशिक – औरंगाबाद या मार्गावरील एसटी बसच्यागाडीतील वाहकाचा औरंगाबादेत मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या वाहकाला जबरदस्तीने ड्युटीवर पाठवले होते, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या बाबत आगार व्यवस्थापकांशी दोन वेळा मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नाशिक औरंगाबाद या मार्गावरील खासगी शिवशाही (एम.एच. १८, बी.जी. १४८७) बस सायंकाळी ५.३० च्या सुमारास औरंगाबाद बसस्थानकात पोहचली. ही बस औरंगाबाद येथे मुक्कामी होती. त्यामुळे सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर चालक आपल्या घरी निघून गेला. पण नाशिक येथील वाहक गाडीतच आराम करत होता.

दरम्यान रात्री रात्री १०.३० च्या सुमारास परिसरात फिरणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना गाडीचा दरवाजा उघडा असल्याचा दिसला. त्यांनी गाडीत डोकावले असता, वाहक झोपलेला दिसला. या कर्मचाऱ्यांनी त्याला उठावण्याचा प्रयत्न केला असता त्याने काहिच प्रतिसाद दिला नाही. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टारांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्याचे नो रिस्पॉन्स

या संदर्भात मुख्य बसस्थानकाचे आगर प्रमुखांशी दोन वेळा मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. दरम्यान प्रशासनाच्या दबावामुळे वाहकाला जीव गमवावा लागला असा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी लावला आहे.

Back to top button