कोल्हापूर : राधानगरीतील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश | पुढारी

कोल्हापूर : राधानगरीतील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश

राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : येथील तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यासमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या शेटकेवाडीत काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या सचिन पांडूरंग वागवेकर यांच्या घरातील ८ लाख ४७ हजार ७५० रूपये रक्कमेचे सोने चांदीचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम चोरीस गेली होती. त्याचा छडा लावण्यात राधानगरी पोलिसांना यश आले आहे.

याप्रकरणी दोन अट्टल चोरट्यांना राधानगरी पोलिसांनी गेल्या आठवड्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी करून त्यांच्याकडून मूद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश घेरडीकर यांनी केला असून त्यांनी सायबर पोलिसांच्या मदतीने चोरीस गेलेला मोबाईल फोनची तांत्रिक तपासणी करून या गुन्ह्यातील संशयित आरोपी विनायक गजानन कूंभार (वय २७, रा. टाकवडे वेस इचलकरंजी, ता. हातकणंगले) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपला मित्र किरण सूभाष पाटील (वय ३३, रा. राणाप्रताप चौक टाकवदे वेस इचलकरंजी) याच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. त्यांना अटक केल्यानंतर त्यांना ९ दिवसाची पोलिस कोठडीत मिळाली होती. त्यांच्याकडून ६ लाख ७८ हजार ७५० रूपये किंमतीचा मूद्देमाल हस्तगत केला आहे. यातील विनायक कुंभार हा अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार असून त्याच्यावर २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

या घटनेचा तपास पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संतोष गोरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश घेरडीकर, खंडू गायकवाड, पो.हे.कॉ. कृष्णा खामकर, कृष्णात यादव, किरण पाटील, दिगंबर बसरकर, रघूनाथ पवार आदींनी केला.

हेही वाचा : 

Back to top button